शुक्रवारपासुन भांडुपमध्ये सेलेब्रिटी क्रिकेट लीगचा दैवज्ञ चषक.

शुक्रवारपासुन भांडुपमध्ये सेलेब्रिटी क्रिकेट लीगचा दैवज्ञ चषक.

येत्या शुक्रवारी (२७ एप्रिल )मुंबईतील सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ भांडुप येथील नवजीवन मैदानावर होणार आहे. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतुन साकारत असलेल्या मुंबईतील सर्वात मोठ्या आणि ग्लॅमरस स्पर्धेसाठी सिनेसृष्टीतील नामांकित सिनेकलाकारानी कंबर कसली असुन स्टार स्पोर्टस वाहीनीच्या स्पोर्ट्स लीग मधील अनेक नामवंत खेळाडू उपस्थिती लावणार आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई महापौर प्रि विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अशोक पाटील, सुनिल राउत, सभापती यशवंत जाधव , सुवर्णा करंजे, विशाखा राउत, रमेश कोरगावकर, उमेश माने प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहतील. सदर प्रसंगी रिशांक देवाडिगा यांचा क्रिडाभुषण व डॉ गजानन रत्नपारखी यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उद्योजक आनंद पेडणेकर आणि श्री श्याम देसाई संबोधित करतील.


Most Popular News of this Week