नाले सफाई बाबत एस विभाग प्रशासन उदासीन. स्थानिंकामध्ये प्रचंड असंतोष... मनसे आंदोलन करणार.

नाले सफाई बाबत एस विभाग प्रशासन उदासीन. स्थानिंकामध्ये प्रचंड असंतोष... मनसे आंदोलन करणार.

विक्रोलीच्या सूर्यनगर वरून येनाऱ्या  नाल्याची आज पर्यत साफ सफाई करण्यासाठी पालिका प्रशासन उदासीन दिसत आहे. सदर नाला सफाई करण्यासाठी पालिका प्रशासन जाणीव पूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप मनसे विक्रोळी विधानसभा अध्यक्षा सुचिता माने यांनी केला आहे.भारत नगर येथील नाल्याची अवस्था पाहून मोठी दुर्घटना घडल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहील असे प्रतिपादन माने यांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण नाला सफाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने जादा सफाई कामगारांची नियुक्ती करावी.व  या मोठया नाल्याची शीघ्रगतीने  साफसफाई करावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुचिता माने यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.


Most Popular News of this Week